बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील मौजे मुचंडी गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा येत्या दि. 12 ते 20 मे 2026 या कालावधीत भरविण्यात येणार असून तब्बल 30 वर्षानंतर ही यात्रा होणार आहे.
मुचंडी गावामध्ये श्री लक्ष्मीदेवी यात्रेसंदर्भातील गावकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कट्टबंद वार पाळून गावातील समस्त नागरिकांच्या उपस्थितीत वरील प्रमाणे मे महिन्यात श्री लक्ष्मी देवीची यात्रा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
त्याचप्रमाणे दि. 5 मे रोजी अंकिया घालण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरले. या वेळी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त गावकऱ्यांच्या निर्णयामुळे आता यंदा मे महिन्यात तब्बल 30 वर्षानंतर मुचंडी गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे. यात्रेची तारीख घोषित करण्यात आल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून गावातील प्रत्येक कुटुंब यात्रेच्या तयारीला लागल्याचे पहावयास मिळत आहे.


