बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च 2025 अखेर 2 कोटी 48 लाख नफ़ा मिळविला आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील व संचालक मंडळ यानी दिली.
बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 24 ऑगष्ट 2025 रोजी स. 11.00 वा. मराठा मंदीर, खानापूर रोड, बेळगांव येथील “अर्जुनराव गोविंदराव घोरपडे” सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यात आला.दि. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अखेर आपल्या बँकेने केलेले आर्थिक व्यवहार व नवीन उपक्रम याची माहिती खालीलप्रमाणे
सन 2024-2025 सालात बँकेच्या एकूण ठेवी 271 कोटी 35 लाख इतक्या आहेत. सभासदांच्या ठेवी सुरक्षितेसाठी बँकेने 5 लाखापर्यत विमा उतरविलेला आहे. जेष्ठ नागरिकाना ठेवीवर 1/2 % जादा व्याजदर देण्यात येत आहे. ठेवीवर एक वर्षाला 8.25% व्याजदर देण्यात येत आहे. तसेच 15 महिन्याला 8.60 % व्याजदर देण्यात येत आहे. एकूण कर्ज वितरण रु. 193 कोटी 44 लाख केले आहे. कर्ज व्यवहार वाढविण्याकरिता बँकेने कर्जाचे व्याजदर समतोल ठेवलेले आहेत. EMI गृह कर्ज 10%, EMI कार कर्ज 10%, EMI सामान्य कर्ज 11.00% याप्रमाणे कर्ज वितरण केले आहे. बँकेचा Gross NPA 2.22 % व Net NPA 0% इतके आहे.
2024-2025 च्या सरकारी लेखा परिक्षणानुसार बँकेला ऑडीट वर्ग “A” मिळालेला आहे बँकेला यावर्षी निव्वळ नफ़ा 2 कोटी 48 लाख झालेला आहे. सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिकदृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रास 82.33% व दुर्बल घटकास 50.47% कर्जाचे वितरण केले आहे.
भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार (कॅपिटल अॅडीक्वसी) (CRAR) शेकडा किमान 12% असणे आवश्यक आहे. आपल्या बँकेचे हे प्रमाण 25.24% इतके आहे. बँकेच्या सक्षमतेचे, सदृढतेचे व आर्थिक स्थैर्याचे हे द्योतक आहे.
देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी * सहकार से समृध्दी’ ही नवीन संकल्पना घेऊन केंद्र सरकारने सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले असून सहकारात परिवर्तन आणले जात आहे. सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अमंलबाजावणीची जबाबदारी देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असून त्यामुळे सहकार क्षेत्र या सरकारी योजनांशी जोडले जाईल व सर्वसामान्य व्यक्तीशी थेट संपर्क वाढणार आहे.
सहकारी बैंकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अंब्रेला ऑर्गनायझेशचीही स्थापना झालेली असून सहकारी बैंकाना तंत्रज्ञान, गुंतवणूक इ. विषयामध्ये मदत मिळणार आहे. सहकारी बैंकिंग क्षेत्र सक्षम व्हावे यासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी परिपत्रके पाठवून पाठपुरावा करीत आहे.
बँकेने ग्राहक सेवेस नेहमीच प्राधान्य दिले आहे. चांगल्या ग्राहक सेवेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेने केलेला आहे. गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात घडलेला महत्वाचा बदल म्हणजे बँकानी तंत्रज्ञानाची धरलेली कास हा होय, तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध होत आहे. बँकेने आधुनिक तंत्रज्ञानचा अंगिकार करुन ग्राहकांना आधुनिक सेवा प्रदान करीत आहोत. आपली बैंक ग्राहकांना सुरक्षित डिजीटल बैंकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कटीबध्द आहे.
संचालक मंडळाने ‘अ’ वर्ग सभासदांना 15% व असोशिएट सभासद याना 8% डिव्हीडंड देण्याची शिफारस केली आहे. वयाची 55 वर्षे वय व सभासद होऊन 20 वर्षे झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सुविधा म्हणून 2500/- सहकार्य निधी देत आहोत. तसेच 2022 साली बँकेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने बँकेच्या सुरवातीपासून 2010 पर्यतच्या सभासदांना रु. 500/- 2010 पासून 2015 पर्यतच्या सभासदांना रु. 300/-व 2015 पासून 31 मार्च 2020 पर्यतच्या सभासदांना रु. 200/- चे बोनस शेअर (के. वाय. सी. ची पुर्तता करुन) देण्याचे जाहीर केले होते त्याचे वितरण चालू केले आहे. सभासदांनी के. वाय. सी. ची पुर्तता करुन आपला बोनस शेअर जमा करुन घ्यावे.
बँकेने चॅरिटी फंडातून परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थाना भरीव आर्थिक मदत केली आहे तसेच बेळगांव परिसरातील सामाजिक व विधायक कार्यात बँकेने सहकार्य केलेले आहे. बँकेच्या वतीने दरवर्षी सभासदांच्या गुणी मुलामुलींचा सत्कार करण्यात येतो.
नवे तंत्रज्ञान, नवीन विचार, नव्या कार्यप्रणाली यांचा अंगिकार करण्याला प्राधान्य देत बैंकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता बँकेने ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. बदलाची गती वाढल्याने त्या बदलाना यशस्वीपणे समोरे जाण्यासाठी नव्या गोष्टी शिकण्याची प्रक्रियाही जलद होणे आवश्यक आहे. बदलण्याऱ्या परिस्थितीशी जमवून घेत पुढील वाटचाल करावयाची आहे. आपली बँक नव्या प्रणाली स्विकारत आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे हे मुद्दाम नोंदवितो.
बाळाराम बाबुराव पाटील चेअरमन आणि संचालक मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.




