belgaum

मंगाईनगर येथील ‘या’ दोन तलावांचे नामफलक पूजन

0
18
 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरून शहरातील वडगाव येथील श्री मंगाईनगर परिसरात असलेल्या दोन तलावांचा अनुक्रमे श्री मंगाई देवी तलाव आणि श्री हनुमान तलाव असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आज उस्फुर्त प्रतिसादात उत्साहात पार पडला.

बेळगाव शहरातील वडगाव येथील श्री मंगाईनगर परिसरात पूर्वापार दोन तलाव असले तरी आजतागायत त्यांचे नामकरण झाले नव्हते. मंगाईनगर परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे हे दोन तलाव स्थानिक रहिवाशांसाठी विशेष करून शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाण्याच्या बाबतीत आजपर्यंत वरदान ठरले आहेत.

त्यामुळे या तलावांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचे नामकरण करण्याचा कार्यक्रम आज बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला. याप्रसंगी बेळगाव शिवसेनेचे (उ.बा.ठा.) उपजिल्हाप्रमुख व मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, तसेच माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या हस्ते तलावांच्या नामफलकाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

 belgaum

तलावांच्या उद्घाटनानंतर बोलताना श्री मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी समयोचित विचार व्यक्त करताना सदर दोन्ही तलाव वडगाव येथील पाटील गल्ली, विष्णू गल्ली वगैरे परिसरातील शेतकऱ्यांकरिता त्यांच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी, त्यांना धुण्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. या तलावाकडे जनावरांना नेण्यासाठी रस्ता असावा याकरता माजी नगरसेवक हलगेकर आणि स्थानिक शेतकऱ्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत.

त्यामुळे जनावरांसाठी रस्ता उपलब्ध झाला आहे असे सांगून आज जनतेच्या मागणीवरून या दोन्ही तलावांचे आम्ही श्री मंगाई तलाव आणि श्री हनुमान तलाव असे नामकरण करत आहोत असे केरवाडकर यांनी जाहीर केले. तलावांच्या नामकरण कार्यक्रमाप्रसंगी समर्थ बाळेकुंद्री, बाळू धामणेकर, आनंद गोंधळी, भालचंद्र उचगावकर, सुशांत हनगोजी, मंजुनाथ भंडारी, मंजू कडोलकर, रेखा लोकरी, मंगल तरळेकर, चंदा पवार, छाया नरगुंदकर, रेणुका रेमानाचे आदींसह परिसरातील शेतकरी आणि रहिवाशी बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.