बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल मच्छे गावातील एका जुगारी अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख रकमेसह एकूण 14,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये महादेव बसवन्ना कुवणे (वय 37, रा. रंगदोळी), ज्योतिबा मारुती दरवेशी (वय 32, संतीबस्तवाड), बसवराज बसप्पा गुंड्यागोळ (वय 27, रा. मार्कंडेयनगर), श्रीकांत जोमा सनदी (वय 30, रा. देवगिरी), दर्शनकुमार विजय तळवार (रा. अरभावी, सध्या रंगदोळी), यल्लाप्पा तिप्पन्ना पेंढार (वय 36, मार्कंडेयनगर), सिद्राई यल्लाप्पा होन्नुंगी (वय 35, संतीबस्तवाड), परशराम लक्ष्मण दरवेशी (वय 32, रा. संतीबस्तवाड), सत्यपा दुर्गप्पा हुंचानट्टी (वय 23, रा. सोमनट्टी ता. गोकाक सध्या भवानीनगर) आणि मंजुनाथ रमेश नायकर (रा. यरगट्टी, सध्या भवानीनगर बेळगाव) यांचा समावेश आहे.
हे सर्वजण काल रविवारी मच्छे गावातील बीसीएम होस्टेलच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील रोख 13,000 रुपयांसह 1200 रुपयांची एक सोलार बॅटरी व जुगाराचे साहित्य असा एकूण 14,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत वावरणाऱ्या एका तरुणाला कॅम्प पोलीसांनी काल ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव हुसेन राजेसाब शेख (वय 26 रा. पिरनवाडी, बेळगाव) असे आहे. हुसेन हा काल रविवारी बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ विचित्र वर्तन करत असल्याचे आढळून आल्याने कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुक्मिणी ए. व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस चौकशीमध्ये हुसेन यांनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.



