बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह : गुरुविन ना सापडे सोय! आजवर गुरु शिष्याची परंपरा भारतात खूप मोठी मानली जाते, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू,गुरुदेवो,महेश्वरा याप्रमाणे गुरूला खूप महत्व आहे . गुरु द्रोणाचार्य, परशुराम,पाच पांडवांना ज्ञान देणारे कृष्ण, लव कुश प्रशिक्षण देणारे गुरु व्यास, गुरु वाल्मिकी त्याच प्रमाणे सत्पाल सारख्या महान मल्लाला तयार करणारे गुरु हनुमान सिंह अशी गुरूंची पासूनची परंपरा चालत आली आहे. त्या परंपरेत आजच्या आधुनिक गुरूंची देखील भर पडतच आहे. केंद्र सरकार कडून गुरुचे योगदान खेळात गाजवलेल्याना द्रोणाचार्य पुरस्कार देखील दिला जातो.
आजच्या खेळात कोच अर्थात प्रशिक्षकांची भूमिका विजयात खेळाडू एवढीच महत्वाची असते. अश्या बेळगावच्या एका कुस्ती प्रशिक्षकाने ग्रीस मधील अथेन्स मध्ये आपल्या शिष्यांच्या मार्फत भारताचा झेंडा फडकावला आहे. आधुनिक इतिहासातील पहिले ऑलम्पिक खेळ झालेल्या, अथेन्स या शहरात यावर्षी झालेल्या 17 वर्षाखालील मुलींच्याकुस्ती विश्व चॅम्पियन स्पर्धेत भारतीय कुस्ती टीमने चॅम्पियनशिप मिळवली आहे.बेळगाववकरां साठी अभिमानाची बाब म्हणजे त्या टीमचे मुख्य कोच बेळगावचे राम पवार आहेत.
यापूर्वी बेळगावातील मराठा रेजिमेंट मध्ये सेवा बजावलेले मूळचे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावचे बेळगावात वास्तव्यास असणारे ज्युनिअर इंडियन कुस्ती टीमचे मुख्य कोच सुभेदार राम पवार यांच्या नेतृत्वाखाली १७ वर्षाखालील भारतीय महिलांच्या कुस्ती टीमने अथेन्स मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. २८ जुलै ते ३ आगस्ट दरम्यान अथेन्स मध्ये विश्व कुस्ती स्पर्धेत अमेरिका जपान मागे टाकत भारताच्या मुलींनी चॅम्पियनची ट्रॉफी पटकावली आहे.

या स्पर्धेत एकूण १० किलो वजन गटात भारतीय मुलींनी सहभाग घेतला होता त्यात ६जणींनी विविध वजन गटात पदके मिळवली आहेत. त्यात 43 किलो वजन गटात – रचना – सुवर्ण ,49 किलो – कोमल – कांस्य,57 किलो – मोनी – रौप्य,61 किलो – यशिता – रौप्य,65 किलो – अश्विनी – सुवर्ण,73 किलो – काजल – रौप्य यांचा समावेश आहे.
भारतीय मुलींच्या टीमने १७ वर्षाखालील मुलींच्या जनरल चॅम्पियनशिप मिळवली त्यात मुख्य कोच राम पवार यांना ट्रॉफी देण्यात आली. विश्व महिला कुस्ती चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 मिळवताना भारतीय संघाने प्रथम – भारत (151 गुण),द्वितीय – अमेरिका (142 गुण)तृतीय – जपान (113 गुण) अशी दैदिप्यमान कामगिरी केली.
या यशामुळे भारतीय ज्युनियर कुस्ती संघाचे सर्वत्र कौतुक होत असून विशेष म्हणजे या स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे राम पवार यांचे विशेष कौतुक होत आहे. भारतात २०३६ साली होणाऱ्या ऑलम्पिक दृष्टीकोनातून कुस्तीत देखील चांगले निकाल येऊ लागले आहेत.



