बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या फिरत्या वाहनांना गणेशभक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्ट रोजी शहराच्या विविध भागांमध्ये ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. बेळगाव शहर महानगरपालिका, बुडा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे नदी आणि तलावांच्या प्रदूषणाला आळा घालणे शक्य होत आहे. गणेशभक्तांना त्यांच्या घराजवळच मूर्ती विसर्जन करण्याची सोय मिळाल्याने त्यांची सोय झाली आहे. मूर्ती विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासही मदत झाली आहे.
या भागात फिरती वाहने उपलब्ध : महानगरपालिका: भाग्यनगर पाचवी क्रॉस, गणेश चौक, पहिला रेल्वे गेट, टिळकवाडी, ढाकोजी दवाखाना, जुना धारवाड रोड, बसवेश्वर सर्कल, खासबाग, सुभाष मार्केट, हिंदवाडी, विश्वेश्वरनगर बस स्टॉप, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, कणबर्गी येथील सिद्धेश्वर देवस्थान रोड, देवराज अर्स कॉलनी येथील जलाशय, झोपडपट्टी सुधारणा कार्यालय, हिंडलगा, सह्याद्रीनगर.
बुडा: रामतीर्थनगर मंदिर, कुमारस्वामी ले-आउट, ऑटोनगर.
प्रदूषण नियंत्रण मंडळ: रामतीर्थनगर मंदिर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, महांतेश नगर, नागलतीमठ जवळ, बॉक्साइट रोड, हनुमान नगर सर्कल, चन्नम्मा नगर एसबीआय बँक, व्हॅक्सिन डेपो, लेले मैदान, टिळकवाडी, श्रीनगर गार्डन, साईबाबा देवस्थान, वंटमूरी, शाहूनगर येथील शेवटचा बस स्टॉप, हरी मंदिर, आंगोळ.
कॅन्टोन्मेंट बोर्ड: फोर्ट कॉम्प्लेक्स, कॅम्प पोलीस स्टेशन, लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी टेकडी, इस्लामिया हायस्कूल, जुने पोस्ट ऑफिस.
हा अभिनव उपक्रम पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच गणेशभक्तांसाठी सोयीचा ठरत आहे.






