मराठा सेंटर येथे 19 ऑक्टो. रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन
द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे दक्षिण भारत विभाग मुख्यालयाच्या विद्यमाने येत्या दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या शिवाजी स्टेडियम येथे 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये सेवानिवृत्त माजी सैनिक आपली सेवा आणि सेवानिवृत्ती वेतनासंबंधी मुद्द्यांबाबत तक्रारी करून मार्गदर्शन व स्पष्टीकरण प्राप्त करू शकतात.
सदर मेळाव्या अंतर्गत माजी सैनिकांच्या सुविधेसाठी वैद्यकीय शिबिर, विविध रेजिमेंट/सेवा, ईसीएचएस सुविधा, स्पर्श अद्ययावतीकरण आणि बँक काउंटर्स स्थापन केले जाणार आहेत.




