belgaum

कन्नडसक्ती विरोधात माजी नगरसेवकांचे पालिका आयुक्तांना निवेदन

0
56
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील कन्नड भाषेची सक्ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन आज माजी नगरसेवक संघाच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांना सादर करण्यात आले.

या वेळी बोलताना, ऍड. अमर येळ्ळूरकर म्हणाले, ”बेळगाव महापालिकेची स्थापना १८५१ मध्ये झाली. ही स्थानिक स्वराज्य संस्था १९८० पर्यंत मराठी भाषेत चालत होती. त्यानंतर आतापर्यंत मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये तिचा कारभार चालला आहे. १९८१ साली कर्नाटक सरकारने स्थानिक भाषेबाबत एक कायदा लागू केला होता.

त्यानुसार, जर एखाद्या भागात १५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक इतर भाषा बोलणारे असतील, तर त्यांना त्यांच्या भाषेतही कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र, सध्याचे महापालिका आयुक्त बेकायदेशीरपणे फलक हटवत आहेत.

 belgaum

त्यांनी कोणत्याही दबावाखाली येऊन मराठी भाषेतील फलक काढू नये. बेळगावमधील नागरिक याला कायदेशीर उत्तर देतील, असा इशारा ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी दिला. यावर मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत यासंदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी महापौर सरीता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर,सुनील बालेकुंद्री उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.