बेळगाव लाईव्ह :हिंदवाडी येथील सुपरिचित Dr आर. आर. वाळवेकर यांच्या निवासस्थानी बागेमध्ये साप दिसताच त्यांनी सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले.
सर्पमित्र चिट्टी तत्काळ त्या ठिकाणी आले, वेलीमध्ये लपलेला धामण साप त्यांना दिसला हा सर्प सामान्य धामण जरी असला तरी लाखात एक आढळणारा रंगहीन (अल्बिनो) सर्प होता.
रंगहीन साप म्हणजे सापाचा मूळ रंग जाऊन, त्या जागी गुलाबी पांढरट किंवा पिवळसर रंग प्राप्त होतो. त्वचेच्या रोगामुळे हा रंगदोष आहे. शरीराचा रंग नियंत्रित करणाऱ्या त्वचेतील मिलेनियम च्या कमतरतेमुळे मूळ रंग नाहीसा होतो.
लाखात एखाद्या सापामध्ये असे घडून येते, मूळ रंग गेल्याने नवीन प्राप्त झालेला रंगामुळे सापाचे सौंदर्य अधिक खुलवतो त्यामूळे त्याला शापित सौदर्य म्हंटले जाते
काही साप अर्ध रंगहीन असतात, हा मात्र सुमारे एक महिन्याचा धामण जातीचा पुर्ण रंगहीन साप आहे, म्हणजे पुर्ण पिवळसर शरिराबरोबर डोळे, जीभही गुलाबी आहेत.
या सापांना या आजारामुळे जास्त ऊन किंवा थंडीचा त्रास होतो, असे साप निसर्गात झटकन शत्रूच्या नजरेस पडतात डोळ्याचाही रंग बदलल्यामुळे ते कमकुवत किंवा अधू होतात त्यामूळे असे साप लवकर मृत्यू पावतात.
मागील २२ वर्षात आपण असे ४ रंगहीन ( अल्बीनो) साप पकडले त्यातील १ वेरूळा, आणि ३ धामण होते, आश्र्चर्य म्हणजे तीनही धामण भाग्यनगर परिसरात पकडले असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले.


