बेळगाव लाईव्ह :हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी काल बुधवारी दोघांना अटक करण्याबरोबरच त्याच्याकडील रोख 2500 रुपये, मोबाईल फोन आणि मटक्याचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अनिल रामा चौगुले (रा. नवी गल्ली बेळगाव) आणि प्रकाश कुरंगी (रा. हलगा, बेळगाव) कशी आहे. सीसीबी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकार्याने उपरोक्त कारवाई केली याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक
मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चाकूच्या स्वरूपातील प्राणघातक शस्त्र जप्त केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव जुबेर सय्यद मोकाशी (वय 30, रा. कलईगार गल्ली बेळगाव) असे आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर आणि त्यांच्या सहकार्याने काल बुधवारी सदर अटकेची कारवाई केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गांजाचे सेवन करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका युवकाला काल बुधवारी मार्केट पोलीसांनी अटक केली.
ताखिर अफजल नालबंद (वय 20, रा. कलईगार गल्ली, बेळगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव आहे. ताखिर हा मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी विचित्र वर्तन करत होता.
ही बाब निदर्शनास येताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघडकीस आले. तेंव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


