बेळगाव लाईव्ह : युरिया खताच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि कृषी तलावांना तारेचे कुंपण घालण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश एल. जारकीहोळी यांच्या हस्ते गोकाक येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना मंत्री म्हणाले की, रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे खताचा वापर वैज्ञानिक शिफारशींनुसारच केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक एच.डी. कोळेकर यांनी युरिया खताच्या दुष्परिणामांवर तसेच युरियाच्या साठ्याबद्दल आणि नॅनो युरियाच्या वापराबद्दल मंत्र्यांना माहिती दिली.
यावेळी गोकाकचे सहायक कृषी संचालक एम.एम. नदाफ, विनायक तुरैदार, अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.




