बेळगाव लाईव्ह : सर्वांना आस लागलीये ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची… नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला बेळगावात प्रसिद्ध अशा ‘बेळगावच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी चव्हाट गल्ली बेळगाव येथे करतात एवढंच काय तर मोठमोठे राजकीय व उद्योगपती देखील बेळगावच्या राजाच्या दरबारात हजेरी लावत असतात.
अशातच यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी बेळगावच्या राजाची पहिली झलक 15 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजीराजे चौकात हजारोंच्या जनसमुदायाला पहायला मिळाली होती. मात्र, सर्वांच्या नजरा जमल्या होत्या बेळगावचा राजाच्या मुकूटावर… बेळगावचा राजाचा प्रथमदर्शनी सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच पार पडला होता.
यानिमित्ताने नाकाडी बंधुकडून गुरुवारी सायंकाळी 5 वाजता चव्हाट गल्लीत चवाटा मंदिर पासून ते मारुती मंदिर पर्यंत भव्य वाजत गाजत सनई आणि हलगीच्या मृदंग टाळच्या गजरात भव्यदिव्य पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात चव्हाट गल्लीत मुकुट आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बेळगावची शान चव्हाट गल्ली म्हणत बेळगावचा राजाची पहिली मुकूट झलक आज बेळगावाकरांनी चव्हाट गल्लीत पाहिली. बेळगावचा राजाचे चांदीचा मुकूट पाहून भाविकांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. बेळगावचा राजा… मोरया.. अशा घोषणांनी चव्हाट गल्लीतील परिसर दणाणून गेला होता.
प्रारंभी गलल्लीत जागृत देवस्थान चवाटा मंदिरात विधिपूर्वक पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित माजी आमदार अनिल बेनके श्रीरामसेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडस्कर, रोहित रावळ सोहन जाधव प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिंगबर पवार, सुनिल जाधव अमर यळळूरकर चंद्रकांत कणबरकर किसन रेडेकर सचिन कणबरकर अनंत बामणे श्रीनाथ पवार संदीप मोहिते, जोतिबा नाईक विश्वजित हसबे भाऊ नाईक लक्ष्मण किल्लेकर, विनायक पवार रोहन जाधव यासह गल्लीतील महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.


