बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हुदली गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एकाला मारीहाळ पोलिसांनी काल अटक करून त्याच्याकडील 1400 रुपये किमतीची दारूची 27 टेट्रा पाकिटे जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव सत्याप्पा नातप्पा तल्लोरी (रा. नायक गल्ली, हुदली) असे आहे. सत्याप्पा हा काल गुरुवारी हुदली गावातील श्री यल्लमा देवी मंदिरा जवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या दारूची विक्री करत होता.
याबाबतची माहिती मिळताच मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून सत्यप्पा याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील 1400 रुपये किमतीची दारूची 27 टेट्रा पाकिटे जप्त केली याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन केलेल्या युवकाला अटक
शहरातील गोवावेस येथील विजय बेकरी जवळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या एका युवकाला काल गुरुवारी टिळकवाडी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे प्रशांत जयसिंग रजपूत (वय 25, रा. झटपट कॉलनी बेळगाव) असे आहे. प्रशांत हा काल गुरुवारी गोवावेस येथील विजय बेकरी जवळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करत होता.
त्यामुळे टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयावरून त्याला पकडले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी गांजाचे सेवन केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रशांत रजपूत अटक करण्यात आली. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


