सोसायटीच्या ठेवीवर आयकर लावता येत नाही – राज बोळमल यांचे स्पष्टीकरण

0
1
 belgaum

बेळगाव लाईव्ह :”सहकारी सोसायटी, सौहार्द सोसायटी किंवा कृषी पतीन सोसायटीनी सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवीवरील व्याजाला आयकर लागू होत नाही. त्यासाठी सोसायट्यांच्या ठेवीवरील व्याज कापले जाऊ नये.” असे स्पष्टीकरण उमेश बोळमल आणि असोसिएट्स चे चार्टर्ड अकाउंटंट राज बोळमल यांनी बोलताना केले. बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशन च्या वतीने कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, सल्लागार मंजुनाथ शेठ, बी ए भोजकर व इतरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

श्री मंजुनाथ सेठ यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर बाळासाहेब काकतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन बोळमल यांचा सन्मान केला. आणि असोसिएशनने घेतलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली.दीप प्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आयकर ,टीडीएस व जीएसटी आदी विषयावर बोळमल यांनी सखोल असे मार्गदर्शन केले .


ग्राहकांच्या ठेवीवरील व्याजावर कर वजा करताना घ्यावयाच्या दक्षता कोणत्या आहेत. याचे मार्गदर्शन बोळमल यांनी केले . टीडीएसच्या 194 ए या कलमाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. “2025- 26 या आर्थिक वर्षात बारा लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर आयकर लागू होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तर मिळणाऱ्या एक लाखापर्यंतच्या व्याजावर टीडीएस नाही” असे सांगून “सरकारने 2015 ला जाहीर केलेल्या नियमानुसार सोसायटी ना कोणत्याही प्रकारचा टीडीएस नाही” असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीयकृत बँका सुद्धा सहकारी बँकाच्या ठेवीवरील व्याजाला टीडीएस लावू शकत नाहीत असे ते म्हणाले.

 belgaum


आयकर भरावयाच्या तारखा, आयकर भरण्याचे वेगवेगळे स्लॅबस याबाबतची ही माहिती त्यांनी दिली. मात्र बँकेमध्ये असलेल्या प्रत्येक ग्राहकाने त्याच्या खात्यावर मिळवलेले व्याज मग ते एक रुपया असले तरीही ही माहिती आयकर विभागाला कळविणे सक्तीचे आहे असे ते म्हणाले.
सहकारी बँकांना जीएसटी कायदा लागू असून तो कशाप्रकारे अमलात आणावा याची माहिती ही त्यांनी दिली.

30000 पेक्षा जास्त असलेल्या एका वेळेच्या जाहिरात बिलावर, कंत्राटदारांना देण्यात येणाऱ्या रकमेवर, पिग्मी कलेक्टरसना दिल्या जाणाऱ्या व्याजावर, बँक इमारतीसाठी दिल्या जाणाऱ्या भाड्यावर कशाप्रकारे टीडीएस आहे याची माहिती ही त्यांनी दिली.
दुपारच्या सत्रात सर्व बँकांच्या सीईओ व जनरल मॅनेजर ना त्यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास बेळगाव जिल्ह्यातील अनेक बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल पायोनियर बँकेचे अनंत लाड तसेच इतर अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले. बीए भोजकर यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.