बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने राज्यभरात मुसळधार पावसासह आजपासून मान्सूनचा जोर आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला असून राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील मंगळूर, कारवार, उडुपी, बिदर, बेळगाव, कलबुर्गी, रायचूर, विजयपुरा, यादगीर, बेल्लारी, चिक्कमंगळूर, हासन, कोडगु आणि शिवमोग्गा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये येत्या 19 ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता आणखी वाढेल. राज्यातील रामनगर, तुमकुर, विजयनगर, मंड्या, म्हैसूर, कोलार दावणगेरे, चित्रदुर्ग, चिक्कबल्लापूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू शहर आणि गदग या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


