बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वाढत्या चाकू भोसकाभोसकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकांपैकी कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी गणेशपुर मेन रोड, सैनिक कॉलनी क्रॉस जवळ दोघा जणांना अटक करून त्याच्याकडील तलवार जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आकाश जयराम पीटर (वय 23, रा. लक्ष्मी नगर गणेशपुर) आणि अमन राज बडोदेकर ( रा. लक्ष्मीनगर बेळगाव) अशी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश व अमन हे दोघे काल गुरुवारी सैनिक कॉलनी क्रॉस जवळ संशयास्पदरित्या जात होते. त्यामुळे कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी ए. व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवून चौकशी केली.
तसेच त्याची झडती घेतली असता दोघांपैकी एकाच्या हातातील पोत्यामध्ये प्राणघातक तलवार आढळून आली. परिणामी पोलिसांनी तलवार जप्त करून आकाश व अमन यांना अटक केली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


