बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य सरकारच्या गेल्या फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झालेल्या ई-आस्थी नोंदणी मोहिमेत बेळगाव जिल्हा अव्वल कामगिरी करणारा जिल्हा म्हणून उदयास आला आहेत.
कर्नाटकमध्ये ई-आस्थी मोहिमेत बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. दैनंदिन वाढीमध्येही बेळगाव महापालिका 20 टक्के पिछाडीवर असली तरी फक्त एका जुलै महिन्यात म्हणजे 28 तारखेपर्यंत बेळगाव जिल्ह्याशी 52 नवीन मालमत्ता जोडल्या गेल्या आहेत. ई-आस्थी पोर्टलवर नोंदणीकृत एकूण 5,14,513 मालमत्तांपैकी बेळगाव जिल्ह्यात इतरांना मागे टाकणाऱ्या 41,053 मालमत्ता आहेत.
यामध्ये ए-खाता अंतर्गत 24,957 आणि बी-खाता अंतर्गत 16,096 मालमत्तांचा समावेश आहे. शहरी मालमत्ता व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला, ई-आस्थी हा महानगरपालिका प्रशासन संचालनालयाचा एक प्रमुख डिजिटल उपक्रम आहे. या उपक्रमाचा मूळ उद्देश राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये कागदोपत्री (मॅन्युअल) प्रक्रिया दूर करणे, त्रुटी कमी करणे आणि मालमत्ता कर प्रणाली सुव्यवस्थित करणे, हा आहे.
दररोज होणाऱ्या वाढीमध्येही बेळगाव जिल्हा आघाडीवर असून 28 जुलै रोजी या जिल्ह्यात 52 नवीन मालमत्तांची भर पडली आहे. बेळगाव मागोमाग म्हैसूरमध्ये एकूण 40,097 ई-आस्थी नोंदणी (26,999 अ-खाता आणि 13,098 ब-खाता) झाल्या आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील एकूण नोंदणीकृत मालमत्तांची आकडेवारी अ-खाता: 2,90,533, ब-खाता: 2,23,980 अशी आहे. ई-आस्थी नोंदणीसाठीची विशेष मोहीम 10 ऑगस्टपर्यंत सुरू सुरू राहणार असून याबाबतीत मात्र बेळगाव महानगरपालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत मागे आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 39 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 19 नगर पंचायती (टीपी), 16 नगरपरिषदा (टीएमसी), 2 शहर नगरपरिषदा (सीएमसी) आणि एक महानगरपालिका आहे. टीपी, टीएमसी आणि सीएमसी यांनी ई-आस्थी नोंदणीमध्ये प्रगती दर्शविली आहे. तथापि, बेळगाव महानगरपालिकांने 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रगती नोंदवली आहे. दरम्यान कनेक्टिव्हिटी समस्या, पडताळणी विलंब किंवा प्रलंबित फील्ड नोंदींमुळे अनेक जिल्ह्यांचे कोणतेही नवीन अपडेट्स मिळाले नाहीत. कर्नाटकमध्ये ई-आस्थी नोंदणीत आघाडीचे पाच जिल्हे पुढील प्रमाणे आहेत. बेळगाव -41,053. म्हैसूर -40,097. तुमकुर -34,297. विजयपुरा -33,655. बेळगाव शहर -33,407.




