कचरा ते हरित ऊर्जा पर्यायी इंधन पेलेट्सच्या पहिल्या संचची पुजा

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल नगरपालिकेच्या कचरा ते हरित ऊर्जा प्रकल्पांतर्गत पालनहार एनर्जी अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संचलीत घनकचरा निर्मुलन प्रक्रिया केंद्रामध्ये बैलहोंगलचे विधानसभा सदस्य व केएलई सोसायटीचे अध्यक्ष आमदार महांतेश कौजलगी यांच्या उपस्थितीत घनकचऱ्यापासून तयार केलेले पर्यायी इंधन पेलेट्सचा 5 टनाच्या पहिल्या संचाची पुजा व पाठवणीचा कार्यक्रम काल उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रारंभी कंपनीचे संचालक श्याम टाकळकर, अरूण कुळकर्णी व रमेश रायजादे यांनी आमदार महांतेश कौजलगी व उपस्थित नगरसेवकांचे स्वागत केले. त्याच्यानंतर बैलहोंगलच्या नगरसेविका सौ. हिरेमठ व सौ. पत्तार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून विधीवत पुजा करण्यात आली.

तद्नंतर आमदार महांतेश कौजलगी यांचा शाल व रोपटे‌ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बैलहोंगल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विरेश हसबी, सौ. अनन्या कुळकर्णी, सुधीर सोनावणे, नगरसेविका सौ. हिरेमठ, सौ. पत्तार, नगरसेवक जंबगी आदी मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

आमदार महांतेश कौजलगी यांच्या विशेष सहकार्यातून व प्रयत्नातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. आमदारांनी प्रकल्पाची पहाणी करून समाधान व्यक्त केले.

देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प, जो विशेष पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये उभा करण्यात आला असून जिथे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची गरज नाही. या प्रकल्पासाठी साडेपाच कोटी रुपयेची गुंतवणूक करण्यात आली असून दररोज 25 टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.