बेळगाव लाईव्ह :आगामी कर्नाटक राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाच्या निवडीकरिता बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने येत्या रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता बेळगाव जिल्हा क्रीडांगण येथे ॲथलेटिक निवड चांचणी आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित क्रीडापटूंनी याची नोंद घेऊन नांव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उडपी येथे येत्या दि. 23 ते दि. 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत आगामी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा सपन्न होणार आहेत. यासाठी बेळगाव जिल्हा संघ निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चांचणी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी नोंदणीसाठी महानगर पालिक/ तहशिलदार यांनी जारी केलेला जन्म दाखला, आधार कार्ड, एएफआय युआयडी क्रमांक वगैरे आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. सदर निवड चांचणीचे वयोगट आणि क्रीडा प्रकार खालील प्रमाणे आहेत.
14 वर्षाखालील मुला-मुलींचा गट (15-10-2011 आणि 14-10-2013 दरम्यान जन्मलेले) : ट्रायथलाॅन
(ए) -60 मी., लांब उडी, उंच उडी. ट्रायथलाॅन (बी)- 60 मी., लांब उडी, बॅक थ्रो ट्रायथलाॅन (सी)- 60 मी, लांब उडी, 600 मी., किड्स भालाफेक. 16 वर्षाखालील मुला-मुलीचा वयोगट (15-10-2009 आणि 14-10-2011 दरम्यान जन्मलेले) : 60 मी., 80 मी. हर्डल्स, 600मी., उंच उडी (फक्त सिझर), लांब उडी(5 मी. अप्रोच), गोळाफेक (स्टॅंडिंग), भालाफेक (10 अप्रोच). 18 वर्षाखालील मुला-मुलींचा गट (15-10-2007आणि 14-10-2009 दरम्यान जन्मलेले) : 100 मी., 200 मी., 400 मी., 1000 मी , 110 मी. हर्डल्स, 100 मी. हर्डल्स (मुली), उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक. 20 वर्षाखालील मुला-मुलींचा गट (15-10-2005 आणि 14-10-2007 दरम्यान जन्मलेले) : 100 मी., 200 मी., 400 मी., 1500 मी., 5000 मी., 110 मी. हर्डल्स, 100 मी. हर्डल्स (मुली), उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक. 23 वर्षाखालील मुला-मुलींचा गट (19-10-2002 च्या नंतर जन्मलेले). तरी सदर निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या हौशी क्रीडापटूंनी अशी अधिक माहितीसाठी मधुकर देसाई (9986594116) अथवा सजीवकुमार नाईक (7892156167) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी अशोक शिंत्रे यांनी केले आहे.


