आशा कार्यकर्त्यांच्या मागण्यांसाठी 12 पासून राज्यव्यापी निदर्शने

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना राज्याचे मानधन आणि केंद्राचे प्रोत्साह धन असे मिळून मासिक किमान 10 हजार रुपये पगार मिळावा आणि गेल्या एप्रिल महिन्यापासून त्याची अंमलबजावणी व्हावी.

या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी येत्या दि. 12 ते दि. 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती एआययुटीयुसीच्या राज्य सचिव डी. नागलक्ष्मी यांनी दिली.

बेळगाव शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. गेल्या मार्च महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व अंगणवाडी आणि मध्यान आहार कर्मचाऱ्यांसाठी तरतूद केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना देखील 10 हजार रुपये प्रोत्साहन धन मिळावे.

 belgaum

शहरातील आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात 2 हजार रुपयांनी वाढ केली जावी. केंद्र सरकारने जून जुलै 2025 मध्ये केलेल्या प्रोत्साहन धन वाढीची अंमलबजावणी राज्यात देखील केली जावी या मागण्यांसह अन्य विविध मागण्यांची माहिती देऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या दि. 12 ते दि. 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने केली जाणार असल्याचे डी. नागलक्ष्मी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस लक्ष्मण जडगन्नवर, गीता रायगोळ, रूपा अंगडी, रिटा फर्नांडिस, लता जाधव आदींसह कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ता संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.