बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखालील टीमने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून उद्यमबाग पोलिसांनी मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
उद्यमबाग परिसरातील एके पी फाउंड्री परिसरात धाड टाकून बेकायदेशीर रित्या गांजा साठवून ठेवलेला तब्बल 23 किलो 900 ग्रॅम इतका मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करत तीन जणांना अटक केली आहे तर तिघेजण फरार झाले आहेत त्यांच्या जवळून 10 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्यमबाग पोलिसांनी जयनगर मच्छे येथील तीन युवकांना अटक केली असून आकाश दिलीप दोडमनी वय 25, निखिल गोपाल सोमजीचे वय 21 आणि वीरेश चंद्रया हिरेमठ वय 19 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याजवळ 23 किलो 840 ग्रॅम अंदाजे सहा लाख 90 हजार किंमतीचा गांजा, होंडाई वेरना कार, सहा मोबाईल 20 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तर नदीम नदाफ रा.जय नगर मच्छे सद्दाम सय्यद रा. कनकला आणि राहुल चव्हाण शिरपूर महाराष्ट्र हे तिघेजण फरार झाले आहेत त्यांचा शोध पोलीस घेतला आहेत. उद्यमबाग पोलीस निरीक्षक डी के पाटील यांच्या नेतृत्वाखालील पीएसआय किरण होणकट्टी आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या तीन वर्षात केलेली ही गांजाची सर्वात मोठी कारवाई आहे या वर्षात बेळगाव पोलिसांनी 16 किलो गांजा तर 2024 या वर्षात केवळ बारा किलो गांजा जप्त करण्यात आला होता मात्र केवळ एकाच धाडीत 23 किलो 80 ग्रॅम गांजा उद्यमबागमधून जात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत 21 केस मधून 40 किलो गांजा जप्त करून 45 जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली.

सदर गांजा महाराष्ट्र मधून बेळगाव मध्ये विक्रीसाठी आणला गेला होता आणि विशेषता कॉलेज शाळा परिसरामध्ये तो सप्लाय करण्याचा प्रयत्न नसताना पोलिसांनी भात टाकून हा गांजा जप्त केला आहे अशी ही माहिती पोलीस आयुक्त बोरसे यांनी दिली.
बेळगाव शहरांमध्ये मागणी आणि पुरवठा दोन्ही पद्धतीचा अमली पदार्थ रोखण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही बोरसे यांनी स्पष्ट केले. व्यसनाधीन ते विरोधात शाळा कॉलेजमधून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत . आगामी दिवसात शाळा कॉलेज प्राचार्यांशी संपर्क साधून एन्ट्री ड्रग कमिटी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये स्थापन केली जाईल आणि याविषयी जनजागृती केली जाईल असेही त्यांनी नमूद करत पालकांनी आणि शिक्षकाने देखील विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष द्यावे असे आवाहन देखील नाही पोलीस आयुक्तांनी केले.


