बेळगाव लाईव्ह : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रशासकीय मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली असून मंडळावर 10 जणांची बिनविरोध निवड झाली आहे.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) प्रशासकीय मंडळामधील व्यापार क्षेत्राच्या 5 आजीवन सदस्य जागा, 1 सर्वसाधारण सदस्य जागा, 3 आजीवन सदस्य जागा आणि 1 सर्वसाधारण सदस्य जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी एकूण 12 जणांनी अर्ज दाखल केले होते.
कालचा सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार व्यापार क्षेत्रातील एका उमेदवाराने आणि औद्योगिक क्षेत्रातील एका उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित 10 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
व्यापार क्षेत्राच्या आजीवन सदस्य जागेसाठी आप्पासाहेब गुरव, रोहित कापाडिया, एम. के. हेगडे, सचिन हंगिरगेकर आणि विजया दरागाशेट्टी यांची अविरोध निवड झाली आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या आजीवन सदस्य जागेसाठी दयानंद नेतलकर, सचिन सबनीस व विनीत हरकूने यांची, तर व्यापार क्षेत्राच्या सर्वसाधारण जागेसाठी सुधीर चौगुले आणि औद्योगिक क्षेत्राच्या सर्वसाधारण जागेसाठी बसवराज रामपुरे यांची निवड झाली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या या सर्व उमेदवारांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


