बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही तालुक्यांत चांगला पाऊस झाला असला तरी काही भागांमध्ये अजूनही समाधानकारक पर्जन्यमान झालेलं नाही.
३१ जुलै २०२५ रोजीच्या अहवालानुसार, बेळगाव जिल्ह्याला सरासरी ३३७ मिमी पावसाच्या तुलनेत ३८२ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच, जिल्ह्यात १३ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला आहे.
विशेष म्हणजे खानापूर तालुक्यात जून आणि जुलै महिन्यात तब्बल १४१४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक आहे. तर केवळ जुलै महिन्यातच खानापूरमध्ये सरासरीपेक्षा १०८ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
दुसरीकडे, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी, मुधोळ, कित्तूर, रामदुर्ग या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून मुधोळमध्ये सरासरीच्या तुलनेत ३० टक्के तर किट्टूरमध्ये २२ टक्के पावसाची घट नोंदली गेली आहे. जिल्ह्यात एकंदरित मान्सून समाधानकारक असला तरी काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. .


