बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाराचे नंबर घेणाऱ्या एका इसमाला टिळकवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील रोख 1790 रुपये, एक मोटोरोला मोबाईल फोन आणि मटका लिहून घेण्याचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव प्रवीणकुमार कृष्णमूर्ती हासन (वय 38, रा. मंडोळी रोड टिळकवाडी, बेळगाव) असे आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घंटामठ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचाऱ्यांनी काल बुधवारी धाड टाकून उपरोक्त कारवाई केली. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणारा गजाआड
शास्त्रीनगर येथील गणपती देवस्थाना जवळ भररस्त्यावर गांजाचे सेवन करणाऱ्या एका युवकाला खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव सत्या उर्फ सत्तू संतोष कवेनिया (रा. शास्त्रीनगर, बेळगाव) असे आहे. शास्त्रीनगर येथे काल बुधवारी गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आनंद अदगोंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


