बेळगाव लाईव्ह :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला बेळगाव येथील पोक्सो न्यायालयाने 30 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव सुधाकर ज्योतिबा जायबा (वय 28, रा. करोशी, ता. चिक्कोडी) असे आहे. न्यायालयाने जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून पीडित मुलीच्या नावावर भरपाई म्हणून 4 लाख रुपये बँकेत जमा करण्याचे आदेशही दिला आहे.
ज्याच्यावर पीडित 5 वर्षांनंतर दावा करू शकते. सदर गुन्हा 30 जून 2022 रोजी बेळगाव येथील एका गावात घडला होता आणि आरोपपत्रात असे आढळून आले की आरोपीला माहित होते की पीडित अल्पवयीन आहे. त्याने तिला कारगाडीमध्ये बसून घेऊन आपल्या नातेवाईकाच्या घरी नेले.
त्या ठिकाणी रात्री अकराच्या दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
न्यायालयात एकूण 8 साक्षी, 47 कागदोपत्री पुरावे आणि 13 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यावेळी आरोपी सुधाकर वरील आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवत उपरोक्त शिक्षा सुनावली सरकारतर्फे ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.



