बेळगाव लाईव्ह :कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ, रस्त्याच्या कडेला मटका संख्यांवरून लोकांकडून पैसे घेऊन ओ.सी. जुगार खेळत असताना धाड टाकून एकास अटक करण्यात आली आहे.
नागराज यल्लप्पा तल्लूर (वय 45), रा. सिद्धेश्वर नगर, कणबर्गी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नागराज याने स्वतःच्या फायद्यासाठी बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. होन्नप्पा तळवार, पीएसआय, माळमारुती पोलीस ठाणे, बेळगाव शहर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. आरोपीकडून एकूण रु. 1,100/- रोख रक्कम, बॉलपेन, ओ.सी. संख्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 132/2025, कलम 78(3) के.पी. कायदा, 1963 अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. या एका प्रकरणात एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून रु. 1,100/- रोख रक्कम आणि ओ.सी. संख्या चिठ्ठ्या इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. छापा टाकणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


