Saturday, December 6, 2025

/

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात लोकप्रतिनिधींशी करणार चर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागच्या कार्यकारिणी ची बैठक, सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीना भेटून करणार चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म.ए युवा समिती सिमाभागची बैठक जत्तीमठ येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते.

कन्नड प्राधिकरणाची बैठक घेऊन मराठीसह इतर भाषा काढून फक्तच कन्नड भाषेच्या पाट्या सर्व सरकारी ठिकाणी लावण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी  बैठक घेण्यात आली बैठकीच्या प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य तसेच मराठा बँकेचे  माजी संचालक  बी. एस पाटील तसेच संभाजी रोडचे जेष्ठ पंच व म.ए समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव पाटील यांच्यासह निधन झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती तसेच तज्ञ समितीची पुनर्रचना केल्या बद्दल सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.

लवकरात लवकर सीमाप्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली.तसेच सरन्यायाधीश म्हणून भुषण गवई यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

 belgaum

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, आदीनी मनोगत व्यक्त केले सिमाभागातील मराठी बहुभाषिक भागातून निवडणून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीना तसेच महापौर यांना भेटून कन्नड सक्ती थांबविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरले हे निवेदन देत असताना राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर अन्याय होताना त्या विरोधात आवाज उठवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. ही सक्ती न थाबविल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

  बैठकीला नारायण मुंचडीकर,विजय जाधव, प्रविण रेडेकर,राजू पाटील,सुधीर शिरोळे,रमेश माळवी,बाबू पावशे, रामनाथ मुंचडीकर, जोतिबा चौगुले,आकाश कडेमनी, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.