बेळगाव लाईव्ह : केव्ही क्र. 2 बेळगाव कॅन्टोन्मेंट शाळेचा विद्यार्थी आणि स्विमर्स क्लब बेळगाव व अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा सदस्य प्रीतम अनिल रेणके याने याने बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 54 व्या केव्हीएस प्रादेशिक क्रीडा स्पर्धेत 1 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदके जिंकून शाळा आणि बेळगावच्या नावलौकिक वाढवला आहे. यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेंगलोर येथील एएससी सेंटर (एस) येथे गेल्या 30 जून ते 1 जुलै 2025 दरम्यान 54 व्या केव्हीएस प्रादेशिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत प्रीतम रेणके याने 50 मी. फ्रीस्टाइल स्ट्रोक शर्यतीत सुवर्ण पदक, 100 मी. फ्रीस्टाइल स्ट्रोक शर्यतीत रौप्य पदक आणि 50 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रीतम याची पुढील महिन्यात बेंगलोर येथे होणाऱ्या केव्ही राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.

प्रीतम रेणके हा केएलईच्या इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल बेळगाव येथे प्रशिक्षक उमेश कलघटगी, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगर, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर यांच्या देखरेखीखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
त्याला डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे. प्रीतमच्या उपरोक्त राज्यस्तरावरील कामगिरीचे आणि यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


