belgaum

बेळगावात शस्त्रांसह तिघांना अटक

0
31
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील चाकू हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनंतर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. मार्केट आणि टिळकवाडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बेकायदेशीरपणे जीवघेणी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. २० जुलै रोजी मार्केट पोलिस स्टेशनचे पीएसआय विठ्ठल हवन्नवर हे इंदिरा कॅन्टीन, जुन्या भाजी मार्केटजवळ संशयित व्यक्तींची तपासणी करत होते.

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी सलमान मोहम्मद. हरशद दलायत (वय ३५), रा. देशपांडे गल्ली, बेळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक बेकायदेशीर धारदार चाकू जप्त करण्यात आला.

याचप्रमाणे टिळकवाडी पोलिस स्टेशनचे पीएसआय पी.जी. डॉली, हे देखील चाकू हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे गस्त घालत असताना, त्यांनी बेळगावातील यरमाळ येथे एका राखाडी रंगाच्या हिरो मोटरसायकलवर स्वार असलेल्या दोन तरुणांना अडवले. या आरोपींची ओळख राकेश मल्लप्पा भंगी (वय १८), रा. मारुती गल्ली, यरमाळ आणि संतोष तातप्पा पाठता (वय १९), रा. मारुती गल्ली, यरमाळ अशी पटली आहे. या दोघांकडून २९ इंच लांब आणि २ इंच रुंद अशी लोखंडी तलवार जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे ३०,००० रुपये आहे. पोलिसांनी तलवार आणि मोटरसायकल दोन्ही घटनास्थळी जप्त केल्या असून तिन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.