‘लिओ’चे जयदीप बिर्जे आयजीबीडीए उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित

0
12
 belgaum

बेळगाव लाईव्ह :इंडो -जर्मन बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयजीबीडीए पार्टनरिंग इन बिझनेस अवॉर्ड्स -2025 या विभागात बेळगावचे युवा उद्योजक लिओ इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप बिर्जे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर (आयआयसी) येथे काल बुधवारी सायंकाळी आयोजित दिमाखदार सोहळ्यात लिओ इंजिनियर्सचे एमडी जयदीप बिर्जे यांना उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे जर्मन दूतावासाचे मंत्री सल्लागार (आर्थिक व्यवहार) डॉ. स्टीफन हेसेलमन, ईएससी (इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषद), वाणिज्य मंत्रालय आणि उद्योग कार्यकारी संचालक गुरमीत सिंग आणि इंडो-जर्मन व्यवसाय विकास संघटनेचे अध्यक्ष राजपाल सिंग यांनी प्रदान केलेला पुरस्कार उद्योजक बिर्जे यांच्यावतीने त्यांचे पुणे येथील प्रकल्प व्यवस्थापक अथर्व शिंदे यांनी स्वीकारला.

लिओ इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप बिर्जे आणि व्यवस्थापकीय भागीदार सौ. सोनाली जयदीप बिर्जे यांनी यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात इंडो -जर्मन पार्टनरशिप प्रोग्रॅम अंतर्गत ड्युसल्डॉर्फ आणि कोलोन येथे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय अलीकडेच त्यांनी जर्मनीतील कांही आघाडीच्या कंपन्यांबरोबर एनडीए अर्थात गोपनीय करारांवर देखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

 belgaum

लिओ इंजिनियर्सने जागतिक सहकार्याच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे.

आयजीबीडीए पार्टनरिंग इन बिझनेस अवॉर्ड्स -2025 मधील मिळालेल्या यंदाच्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराबद्दल बोलताना जयदीप बिर्जे यांनी हा पुरस्कार म्हणजे आमच्या प्रयत्नांचे, कठोर परिश्रमांचे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीबाबतच्या आमच्या कटिबद्धतेचे मोठे मानांकन असल्याचे म्हंटले आहे.

प्रवासातील अडचणीमुळे आपण पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित राहू शकलो नसल्याची खंत व्यक्त करून हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या समर्पण, एकजूट आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. नवोन्मेष, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा सन्मान करणाऱ्या मंचाचा भाग होणे ही मोठीच गौरवाची बाब आहे, असेही उद्योजक जयदीप बिर्जे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.