बेळगाव लाईव्ह : रस्त्याकडेला दगडफेक करत बसलेल्या एका मनोरुग्ण इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी समजूत काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.
मानसिकदृष्ट्या आजारी असलेली एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला दगडफेक करत असल्याची माहिती सकाळी सामाजिक कार्यकर्ते सौरभ सावंत आणि अवधूत तुडवेकर यांना मिळाली.
तेंव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्या मनोरुग्ण इसमाची विचारपूस केली. दरम्यान रुग्णवाहिका ही मागविण्यात आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मनोरुग्ण इसमाची समजूत काढून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले.
माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कृतीची संबंधित परिसरात प्रशंसा होत होती. मनोरुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या मदत कार्यात टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचेही सहकार्य लाभले.
याबद्दल कार्यकर्ते सौरभ सावंत आणि अवधूत तुडवेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


