बेळगाव लाईव्ह: हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये या जुलै महिन्यात आज शुक्रवारी 25 जुलैपर्यंत 154 मि.मी. या सर्वसामान्य सरासरीपेक्षा 21 मि.मी. कमी पाऊस झाला असला तरी नैऋत्य मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे गेल्या 1 जानेवारी 2025 पासून आजपर्यंत 395 मि.मी. या एकूण सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत 172 मि.मी. इतक्या ज्यादा पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या पर्जन्यमापनानुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या जून 2025 मध्ये एकूण पाऊस सर्वसामान्य पावसाच्या तुलनेत 70.6 मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. जूनमधील 146.3 मि.मी. पावसाच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष 216.9 मि.मी. इतका जास्त पाऊस पडला आहे.
गेल्या 24 तासात आज शुक्रवारी 25 जुलै रोजी सकाळी सामान्य पाऊस आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस कमी जास्त न होता 6 मि.मी. इतका समान नोंद झाला आहे. गेल्या आठवड्याभरात म्हणजे दि. 19 ते दि. 25 जुलै 2025 दरम्यान सर्वसामान्य पाऊस 43 मि.मी. आणि प्रत्यक्ष पाऊस 30 मि.मी. इतका नोंदवला गेला असल्यामुळे या कालावधीत पावसामध्ये 13 मि.मी. घट झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या दि. 1 ते दि. 25 जुलै 2025 पर्यंत एकूण सरासरी पावसापेक्षा 21 मि.मी. कमी पाऊस नोंदवला गेला आहे. या कालावधीत एकूण सर्वसामान्य पाऊस 154 मि.मी. होत असतो, मात्र यावेळी तो 133 मि.मी. इतका नोंद झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे 2025 मध्ये दमदार आगमन झाल्यामुळे गेल्या दि. 1 जून ते आज 25 जुलै या कालावधीमध्ये 300 मि.मी. या सर्वसामान्य सरासरी पावसापेक्षा 350 मि.मी. इतका प्रत्यक्ष पाऊस पडला आहे.
थोडक्यात या आणि मागील महिन्यात सरासरीपेक्षा 50 मि.मी. जादा पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात गेल्या दि. 1 जानेवारी ते आज दि. 25 जुलै 2025 या दरम्यान सर्वसामान्य सरासरीपेक्षा 172 मि.मी. जास्त पाऊस आला आहे. सदर जवळपास सात महिन्यांच्या कालावधीत 395 मि.मी. इतक्या सर्वसामान्य सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष 567 मि.मी. इतका जादा पाऊस पडला आहे.


