बेळगाव लाईव्ह : रायचूर येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ८ ते २५ ऑगस्ट दरम्यान अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. बेळगाव, बिदर, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर आणि यादगिरी या सहा जिल्ह्यांतील उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या तारखांनाच उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.
बेळगाव, बिदर, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर आणि यादगिरी जिल्ह्यांतील उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. आधीच झालेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल www.joinindianarmy.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठवण्यात आली आहेत.
प्रवेशपत्रात नमूद केलेल्या निर्धारित तारखांना उमेदवारांनी मेळाव्यात भाग घ्यावा. परीक्षेत उमेदवारांची पात्रता/कामगिरी या आधारावर मेळाव्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही मध्यस्थांच्या आमिषांना बळी पडू नये. उमेदवारांची पात्रता आणि क्षमतेच्या आधारावर अंतिम निवड होईल, असे अग्निवीर भरती विभागाचे संचालक कर्नल ए.के. उपाध्याय यांनी एका प्रसिद्धीपत्रकात कळवले आहे.


