बेळगाव लाईव्ह : बेंगलोर येथे विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींना सुरक्षा व्यवस्था पुरवली जावी या मागणीसाठी ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या बेळगाव शाखेतर्फे आज आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या (एआयडीएसओ) बेळगाव शाखेच्या विद्यार्थिनींनी आज बुधवारी सकाळी शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने केली.
यावेळी बेंगलोर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करून पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याच्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी हातात निषेधाचे आणि न्यायाच्या मागणीचे फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या.
चन्नम्मा चौकात निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.


