belgaum

‘या’ अपघाताच्या ब्लॅक स्पॉटबाबत जीआयटीचा एनएचएआयकडे अहवाल

0
17
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील बडेकोळ्ळमठ वळणा जवळील अपघातांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केएलएस गोगेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (जीआयटी) सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला (एनएचएआय) सविस्तर तपासणी अहवाल सादर केला आहे.

बेळगाव पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिरेबागेवाडी घाटजवळील उतरत्या वळणाला आता गंभीर धोकादायक वळण (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जीआयटीच्या प्राध्यापिका अर्चना शागोती, सोमनाथ खोत आणि कार्तिक कुलकर्णी यांनी गेल्या 12 जुलै रोजी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षकांसमवेत अपघातप्रवण मार्गाची प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीमुळे रस्त्याच्या विशेषतः उतरत्या वळणावरील भूमितीतील लक्षणीय कमतरता उघडकीस आली. अहवालात असे नमूद केले आहे की इंडियन रोड काँग्रेसने (आयआरसी) प्रति तास 80 कि.मी. वेग मर्यादा असलेल्या क्षेत्रांसाठी 230 मीटर्स शिफारस केलेल्यापेक्षा सदर वळणाची वक्र त्रिज्या फक्त 220 मीटर्स इतकी कमी आहे. याव्यतिरिक्त कॅरेजवेची रुंदी 11.3 मीटर वरून अंडरपासजवळ फक्त 9.53 मीटर पर्यंत धोकादायकपणे कमी होत असून ज्यामुळे अपघातांची वारंवारता वाढवत आहे. अहवालात असेही अधोरेखित केले आहे की या वळणाच्या रस्त्यावरून वाहने अनेकदा वेगाने जातात आणि ओळीमध्ये जाण्याच्या शिस्तीचा (लेन डिसिप्लिन) अभाव असल्याने अपघातांचा धोका आणखी वाढतो. काँक्रीट क्रॅश बॅरियर्स आणि रंबल स्ट्रिप्स सारखे सुरक्षा उपाय आधीच बसवले गेले असले तरी जीआयटीच्या टीमच्या मते हे सुरक्षा उपाय चालू धोक्याला तोंड देण्यासाठी अपुरे आहेत.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी अहवालात तात्काळ कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रमुख चिन्ह फलकासह ताशी 65 कि.मी.ची कडक वेग मर्यादा निश्चित करणे, नियमित अंतराने फ्लॅशिंग लाइट्स बसवणे, जुन्या गार्ड रेलमध्ये आधुनिक क्रॅश बॅरियर्ससह सुधारणा करणे, रस्त्यावरील दृश्यमान खुणांद्वारे चांगली लेन शिस्त लागू करणे आणि पाळत ठेवणारे स्मार्ट कॅमेरे तैनात करणे यांचा समावेश आहे. आवश्यक कारवाईसाठी संपूर्ण अहवाल औपचारिकपणे एनएचएआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. बडेकोळ्ळमठ वळणाच्या ठिकाणी मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत असून अधिक जीवितहानी होण्यापूर्वी जलद आणि अर्थपूर्ण हस्तक्षेपाची अपेक्षा केली जात आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.