बेळगाव लाईव्ह :झाडाची मोठी फांदी पडल्याने एका कार गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील हॉटेल मधुरा समोर घडली.
फांदी कोसळली त्यावेळी सुदैवाने कारगाडीमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हॉटेल मधुरासमोर आज नेहमीप्रमाणे ग्राहकांनी आपल्या कारगाड्या पार्क केलेल्या होत्या.
मात्र त्यानंतर पावसाळी हवामानासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळच्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून खाली असलेल्या दोन कार गाड्यांवर कोसळली.
नेमक्या त्याच वेळी ड्रायव्हर मंडळी कारगाडीमध्ये नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
तथापि कोसळलेल्या फांदीमुळे दोन पैकी एका कार गाडीचे मोठे नुकसान झाले. फांदी कार गाड्यांवर कोसळून मोठा आवाज होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.