बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह राज्यातील चार प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. याबाबतचा संदेश प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे
रविवारी दुपारी कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, मंगलोर आणि बंगळुरू विमानतळांच्या संचालकांना विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा संदेश ई-मेलद्वारे पाठवण्यात आला. राज्यातील चार विमानतळांवर रोडकिल क्यो नावाच्या ई-मेल आयडीवरून धमकीचा संदेश मिळाला झाला त्यामुळे सर्वच विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून, स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
विमानतळ परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आणि जनतेची कडक तपासणी केली जात आहे. बॉम्ब निकासी पथक, श्वान पथकाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी, अंतर्गत सुरक्षा कर्मचारी आणि गुप्तचर विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील बेळगाव सहज देशातील सर्व विमानतळावर अलर्ट घोषित करण्यात आला होता बंदोबस्त ही वाढवण्यात आला होता आता पुन्हा बॉम्बने उडविण्याची धमकी मिळताच, बॉम्ब निकासी पथक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची बैठक झाली असून स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था केली.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळा भोवती सुमारे ५०-६० एकर क्षेत्राची तपासणी केली आहे. ज्या ईमेल आयडीवरून संदेश आला होता त्याची माहिती ते पोलिसांना देतील आणि गुन्हा दाखल करतील असे त्यांनी सांगितले.
याआधीही बेळगाव विमानतळाला बॉम्बने उडवण्याची अनेकदा धमकी आली होती त्यावेळी विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे रविवारी पासून देखील बेळगाव विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


