बेळगाव लाईव्ह – येथील समर्थ अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने 30 मे 2025 रोजी सुरु केलेली 30 महिन्यांची विशेष ठेव योजना नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. या योजनेला केवळ काही दिवसांतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ठेवीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर पुढे सरसावले आहेत.
ही योजना 30 जून 2025 रोजी बंद होणार आहे.
या योजनेत ठेवीदारांना 30 महिन्यांच्या कालावधीसाठी वार्षिक 11 टक्के आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणूक, विश्वासार्ह संस्था आणि स्थिर परतावा यामुळे अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
समर्थ अर्बन सोसायटीचे चेअरमन अॅड. अजय सुनाळकर म्हणाले की, “या योजनेला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकहित हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही अॅड. सुनाळकर यांनी यावेळी केले.

“ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून समर्थ सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
योजनेच्या यशस्वी प्रतिसादामुळे सोसायटी भविष्यातही अशाच फायद्याच्या योजना आणणार आहे. ठेवीदारांचा वाढता विश्वास आणि सहभाग हेच आमच्या यशाचे गमक असल्याचेही अॅड. सुनाळकर यांनी स्पष्ट केले.



