बेळगाव लाईव्ह : खानापूर-बिडी मार्गावर झुंजवाड क्रॉस या ठिकाणी दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. झुंजवाड क्रॉस या ठिकाणी नंदगड कडून बीडीच्या दिशेने जात असताना, दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे.
या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका धारवाड असे आहे. अपघात नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे.
अपघातात ठार झालेल्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला होता. घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकाचे पीएसआय एस एस बदामी व हवालदार पांडू तुरमुरी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यात धारवाड जिल्ह्याचा मयत झालेला हा दुसरा अपघात आहे काल रविवारी जांबोटी क्रॉस येथे हुबळी जवळील एका युवकाचा कॅन्टरच्या धडकेत मृत्यू झाला होता.


