नालासफाई कामाची आमदारांकडून पाहणी

0
5
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा एक भाग म्हणून पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याच्या तक्रारींची दखल घेत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी सोमवारी कोटीकरे अर्थात किल्ला तलाव परिसराला भेट देऊन जातीने तेथील नाल्यांच्या सफाईचे काम तपासले.

आमदारांच्या सदर पाहणीदरम्यान प्लास्टिक, थर्माकोल आणि अन्य न विघटनशील कचऱ्यामुळे नाले पूर्णपणे बंद झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा आमदार सेठ यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्वरित बाबा सफाईचे काम हाती घेऊन काढलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना दिली.

याप्रसंगी त्यांच्या समवेत युवानेते अमान सेठ, महापालिका आयुक्त शुभा बी. आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले.

 belgaum

नागरिकांशी संवाद साधताना आमदार असिफ सेठ म्हणाले, “आपले शहर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नाले हे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आहेत, कचरा टाकण्यासाठी नव्हे. कृपया प्लास्टिक, थर्माकोल किंवा घरगुती कचरा नाल्यांमध्ये फेकू नका. तो कचरा दररोज घरोघरी येणाऱ्या पालिकेच्या घंटागाड्यांमध्ये द्यावा.


शासन आणि प्रशासन आपले काम करत असले तरी नागरिकांचे सहकार्य व जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त शुभा बी. यांनी अभियंत्यांना व सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या बाबतीत असुरक्षित असलेल्या भागांमध्ये नियमित तपासणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. यावेळी नगरसेवकांनीही जनजागृतीसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

स्थानीय नागरिकांनी आमदार सेठ यांच्या थेट हस्तक्षेप व तात्काळ कारवाईचे स्वागत केले. तसेच त्यांच्या उपस्थितीमुळे अधिकारी आणि जनता अशा दोघांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. आमदारांचा पाहणी दौरा हा बेळगाव उत्तर मतदारसंघातील विविध भागांत होणाऱ्या मान्सूनपूर्व उपाययोजनांचा भाग असून या उपक्रमातून नाल्यांचे साफसफाई, पाणी साचण्याची समस्या सोडवणे आणि सार्वजनिक सहभागाद्वारे स्वच्छ आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.