बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने जाहीर केलेल्या बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमधील पर्जन्यमानाच्या अर्थात पावसाच्या आकडेवारीनुसार गेल्या दि. 1 ते 29 जून 2025 या कालावधीत खानापूर आणि बेळगाव तालुक्यात सर्वाधिक अनुक्रमे 741 मि.मी. व 306 मि.मी इतका पाऊस झाला असून सर्वात कमी म्हणजे 56 मि.मी. पावसाची नोंद मुडलगी तालुक्यामध्ये झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात जून महिन्यात काल रविवारी 29 जूनपर्यंत खानापूर तालुक्यात 355 मि.मी. या सर्व सामान्य सरासरीपेक्षा 386 मि.मी. आणि बेळगाव तालुक्यात 230 मि.मी. या सरासरीपेक्षा 76 मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील रामदुर्ग, मुडलगी व यरगट्टी वगळता सर्व तालुक्यांमध्ये जून महिन्यातील सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
गेल्या मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्वसामान्य सरासरी पेक्षा जास्त दुप्पट -तिप्पट पर्जन्यमान नोंद झाले असून खानापूर (207 मि.मी.) आणि निपाणी (246 मि.मी.) येथे सर्वाधिक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने 2025 मधील बेळगाव जिल्ह्यातील पर्जन्यमानाची मिलिमीटरमध्ये जाहीर केलेली आकडेवारी (अनुक्रमे तालुक्याचे नांव, सामान्य पर्जन्यमान, वास्तविक पर्जन्यमान यानुसार) खालील प्रमाणे आहे.
एकूण पर्जन्यमान मे 2025 : अथणी -53 मि.मी., 148 मि.मी.. बैलहोंगल -72, 167. बेळगाव -88, 167. चिक्कोडी -63, 185. गोकाक -61, 150. हुक्केरी -80, 170. खानापूर -71, 267. रामदुर्ग -55, 133. रायबाग -47, 144. सौंदत्ती -74, 148. कित्तूर -74, 140. निपाणी -53, 246. कागवाड -52, 150. मुडलगी -61, 149. यरगट्टी -69, 166. बेळगाव शहर -61 मि.मी., 163 मि.मी..
मान्सूनपूर्व एकूण पर्जन्यमान : अथणी -76 मि.मी., 196 मि.मी.. बैलहोंगल -113, 249. बेळगाव – 155, 237. चिक्कोडी – 90, 229. गोकाक -97 182. हुक्केरी -118, 207. खानापूर -110, 260. रामदुर्ग -84, 188. रायबाग -70, 177. सौंदत्ती -105, 240. कित्तूर -125, 233. निपाणी -84, 280. कागवाड -74, 214. मुडलगी -95, 161. यरगट्टी – 94, 219. बेळगाव शहर -93 मि.मी., 217 मि.मी..
एकूण पर्जन्यमान 1 ते 29 जून 2025 : अथणी -80 मि.मी., 88 मि.मी.. बैलहोंगल -142 154. बेळगाव -230, 306. चिक्कोडी – 96, 117. गोकाक -75, 95. हुक्केरी -90 159. खानापूर -355 741. रामदुर्ग -71, 70. रायबाग -73, 80. सौंदत्ती -90 103. कित्तूर -191, 230. निपाणी -154, 220. कागवाड -100, 139. मुडलगी -78, 56. यरगट्टी -84, 80. बेळगाव शहर -141 मि.मी., 208 मि.मी..


