बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातांची कत्तल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली असून, गोरक्षकांच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळीच रोखण्यात आला आहे.
५ जूनच्या मध्यरात्री सुमारे २ वाजता, बेळगाव शहरातील टोपी गल्ली भागात काही ठिकाणी गोमातांची कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती गोरक्षक मारुती सुतार यांना मिळाली.
माहिती मिळताच सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना यासंदर्भात कळवले. पोलिसांच्या मदतीने गोरक्षकांनी संबंधित ठिकाणी धाव घेत गोमातांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्या सर्व जनावरांना श्रीनगर, बेळगाव येथील गोशाळेत सुरक्षितरित्या हलवण्यात आले.

