बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक गोपाळ इरोजी पाटील यांचे वयाच्या 74 व्या वर्षी 17 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आज त्यांचा अकराव्या दिवसाच्या निमित्ताने…
गोपाळ पाटील यांचा जन्म शेतकरी परंतू सदन व एकत्र कुटुंबात झाला. काका व वडिलांच्या हयातीत व पश्चात शेती,जनावरे व घरची जबाबदारी त्यांचावर पडली त्यामुळे त्यांना शिक्षणांत व राजकरणांत विशेष लक्ष देता आले नाही .
परंतू त्यांचे तीनही बंधू उच्चशिक्षीत होऊन राजकरणांत व व्यवसायात यशस्वी झाले . मोठे बंधू कै .एम आय पाटील यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध सहकारी संस्था स्थापन केल्या तर दुसरे कै. बी.आय. पाटील हे चार वेळा आमदार झाले तर लहान बंधू आर आय पाटील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत .

या सर्व बंधूच्या कार्याचा त्यांना खुप मोठा अभिमान होता परंतु अजिबात गर्व नव्हता. त्यांनी शेती व पशू संगोपनातून आपला गावासह परिसरात वेगळा ठसा उमटविला होता . बैलजोडीची त्यांना विशेष आवड होती 80 ते 90 च्या दशकांत त्यांनी जोपासलेल्या बैलजोड्यांनी अनेक शर्यती गाजवल्या होत्या . शेतीतही विविध प्रयोग करून ते अन्य शेतकऱ्यां समोर आदर्श निर्माण केला होता . पत्नीचे अकाली निधन झाले पण न डगमगता त्यांनी मुलांना आधार दिला .
त्यामळे त्यांच्या त्यांची मुले किसन शेती व शैक्षणिक व्यवसायात अग्रेसर असून प्रशांत राजकीय वारसा जपत ग्राम पंचायत सदस्यतेच्या माध्यमातून समाज सेवा करत आहे. अशा या कष्टाळू व परोपकारी व्यक्तीमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली –
अश्वीन पाटील