बेळगाव लाईव्ह: अमली पदार्थ विक्री आणि मटका जुगार काळा धंद्यावर बेळगाव पोलिसांची धाड सुरूच असून रविवारी बेळगाव पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्या जवळून रोख रक्कम आणि गांजा जप्त केलाय.
बेळगाव पोलीस आयुक्त व्यक्तीतील मार्केट आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दोन विविध ठिकाणी धाडी टाकत तीन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याजवळून 52 हजार किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांनी मिळालेल्या माहितीवर रविवारी भरतेश शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून आरोपी उमेश सुरेश उरुबिनट्टी, रा. अक्कतंगेरहाळ, जि. बेळगाव याला अटक करून त्याच्या जवळील 20,000/- रुपये किमतीचे 627 ग्रॅम गांजा, 4,090/- रुपये रोख आणि एक मोबाइल असा एकूण 26,340/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2025, कलम 20(b)(ii)(A) एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
अन एका दुसऱ्या कारवाईत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य राजन यांनी पिरनवाडी येथे जनता प्लॉट जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून आरोपी 1) वर्धन अनंत कांबळे, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव आणि 2) पार्थ रमेश गोवेकर, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव यांना अटक करत त्यांच्या जवळील 6,800/- रुपये किमतीचे 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 121/2025, कलम 20(b)(ii)(A) एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.