बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात एटीएम मधून पैसे चोरण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बऱ्याच एटीएम मधील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू राहतील याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
शहरामध्ये अलीकडे सीसी कॅमेरे बंद असल्यामुळे एटीएम मधून पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील सरदार हायस्कूल मैदाना मागील एका बँकेच्या एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे.

या पद्धतीने शहर उपनगरातील बऱ्याच एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय अवस्थेत असल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बँकांनी आपल्या एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून ते सतत कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी.
त्याचप्रमाणे एटीएमच्या ठिकाणी सतर्क सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांमधून केली जात आहे.


