बेळगाव लाईव्ह :रिक्षाच्या भाड्याची मागणी केली म्हणून एका ऑटोरिक्षा चालकावर हल्ला करून त्याला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना आज बुधवारी सकाळी समर्थनगर येथे घडली.
हल्ला झालेल्या ऑटो रिक्षा चालकाचे नाव अल्ताफ हुसेन असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ याच्या ऑटोरिक्षात बसून एका प्रवाशाने त्याला बस स्टॉपपासून समर्थनगर येथे सोडण्यास सांगितले. इच्छित स्थळी सोडल्यानंतर अल्ताफ याने त्या प्रवाशाकडे भाडे मागितले असता.
त्या प्रवाशासह चार-पाच जणांनी अल्ताफ याच्यावर हल्ला चढवून त्याला लाठ्या-काठ्याने मारहाण केली. सदर हल्ल्यात जखमी झालेल्या अल्ताफ याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सदर घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.
गेल्या आठवड्यात बस मधील खिडकी शेजारील सीट वरून झालेल्या वादात एका युवकांच्या टोळक्याने विद्यार्थ्यांला भोसले होते त्या घटनेनंतर बेळगाव पोलिसांनी चाकू प्रतिबंधक पथकाची स्थापना करत ठिकठिकाणी तपासणी मोहीम हातात घेतली आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेला ऑटो रिक्षावर हल्ला चिंता वाढवणारा विषय आहे त्यामुळे बेळगाव पोलिसांना शहर शांत ठेवण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.
बेळगाव पोलिसांनी काळ्या धंद्या विरोधात विशेषता मटका जुगार विरोधात आणि अमली पदार्थ विक्री विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे अशातच अशा घटनांवर देखील नियंत्रण राखणे गरजेचे असणार आहे.