बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या दोन नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणी आगामी 11 जून रोजी नगर विकास खात्यात सुनावणी होणार आहे. या संदर्भात नगर विकास खात्याचे अधीन कार्यदर्शी टी मंजुनाथ यांनी सुनावणीस हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
नगरसेवक जयंत जाधव यांच्यासह अन्य एक नगरसेवकाला ही नोटीस देण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक जयंत जाधव यांच्यासह आणखी नगरसेवकाने गोवा वेस बसवेश्वर सर्कल खाऊ कट्ट्यातील खाद्यपदार्थांच्या गाळ्यांमध्ये दुकान मिळवत महापालिकेतील सदस्य असूनही अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी केला होता.
मळगुंद यांच्या तक्रारीवरून बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी या दोघांना अपात्र देखील ठरवले होते. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होतीआता नगरविकास विभागाचे अवर सचिव यांनी 11 जून रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
या दोन अपात्र ठरलेल्या भाजप सदस्यांनी अपात्रतेविरुद्ध तक्रार दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर, नगरविकास विभागाने 11 जून रोजी सुनावणीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे त्यामुळे आता या खाऊ कट्ट्याच्या होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


