बेळगाव लाईव्ह :रेल्वे रूळ ट्रॅक वरून घसरल्याने हुबळी विभागातील कॅरनझोल कॅसरलॉक दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
रविवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान वास्को-द-गामा यशवंतपुर रेल्वे क्रमांक 173 10 या रेल्वे गाडीचा डबा कॅरम जवळ आणि केसरलास च्या मध्ये रेल्वे रुळावर घसरल्याने अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नसल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे मात्र या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
२५.०५.२०२५ रोजी हुबळी विभागातील कॅरनझोल आणि कॅसल रॉक दरम्यान अंदाजे ०२:३० वाजता ट्रेन क्रमांक १७३१० (वास्को द गामा – यशवंतपूर) चा एक डबा रुळावरून घसरल्याने, ट्रेनचे कामकाज प्रभावित झाले आहे, कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नसल्याचे रेल्वे कडून कळवण्यात आले आहे.
२५.०५.२०२५ रोजी सकाळी ०६:३० वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक १८०४८ वास्को द गामा – शालीमार, ०२ तास उशिराने, ०८:३० वाजता सुटण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
नियमित ट्रेन:
२३.०५.२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी ट्रेन क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा सध्या लोंढा येथे नियमित आहे.
प्रवासी सुविधा:
लोंडा स्थानकावर अंदाजे १,००० प्रवाशांसाठी नाश्ता, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुनर्स्थापनेचे प्रयत्न:
- पुनर्संचयनाचे काम जलद करण्यासाठी वास्को द गामा येथून अपघात निवारण ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
- महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रेल्वे रूळ व्यवस्थित करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि रेल्वे सेवांमध्ये पुढील कोणतेही बदल झाल्यास त्वरित कळवले जाईलअसेही सांगण्यात आले आहे.