बेळगाव लाईव्ह : १ मे २०२५ रोजी सालाबादप्रमाणे शिवजयंतीनिमित्त बेळगाव शहरात चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
सदर मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातून सुरू होऊन कपिलेश्वर मंदिराजवळ समाप्त होणार आहे. या मिरवणुकीदरम्यान शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. दुपारी २.०० वाजल्यापासून मिरवणूक पूर्ण होईपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक मार्ग बदल करण्यात आले आहेत:
राणी चन्नम्मा चौक मार्गे कॉलेज रोडवरून खानापूर कडे जाणारी वाहने – या मार्गावरील वाहनचालकांनी गणेश मंदिरामागून उजवीकडे वळून क्लब रोडमार्गे गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शर्कत पार्क, ग्लोबथिएटर मार्गे खानापूर रस्त्याकडे मार्गक्रमण करावे.
जिजामाता सर्कलहून देशपांडे पंप, नरगुंदकर चौक, कांबळीखूट, पिंपळकट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने – यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जिजामाता सर्कलहून थेट जुन्या पीबी रोडने पुढे जावे.
गोवावेस सर्कल व नाथ चौक येथून बँक ऑफ इंडिया मार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहने – बँक ऑफ इंडिया चौक येथून हुबळी पिंपळकट्टा, जुन्या पीबी रोड मार्गे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.
बेळगाव वाहतूक विभागाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून आणि योग्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे कळवण्यात आले आहे.