बेळगाव लाईव्ह :काही दिवसांपासून बेळगाव सह कर्नाटक, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक दिलासा दायक आणि मोठी बातमी समोर आली आहे.
मान्सून अखेर केरळ मध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे.
तर कर्नाटकासह बेळगाव मध्ये देखील मान्सून दाखल झाल्याचे माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पावसाने सर्वच परिसरात दणादण उडवली होती. आता पुन्हा मान्सून सक्रिय झाला तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आठ दिवसआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे.
आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.